Browsing Tag

Raver

बोरघाटात क्लूझरचा भीषण अपघात ; १ ठार,११ जखमी

बोरघाटात क्लूझरचा भीषण अपघात ; १ ठार,११ जखमी पाल ता. रावेर – पाल–खिरोदा दरम्यान असलेल्या बोरघाटात दि. १० ऑक्टोबर सकाळी सुमारास १० वाजता क्लूझर (क्र. MH19 CF 3920) वाहनाचा भीषण अपघात झाला. भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथील नागरिक पालकडे…

अजंदे शिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अजंदे शिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या सोशल मीडियावर ठेवला स्टेटस; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद रावेर प्रतिनिधी : तालुक्यातील अजंदे शिवारात एका २१ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

अवैध मुरुम वाहतुकीवर जनतेचा दणका

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यात अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरवर जनतेने थेट कारवाई करत तीन डंपर जप्त करून प्रशासनाकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे मुरुम वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली असून स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.…

आमदारसाहेबांनी RTO ला फटकारले तरीही..

मोरगांव ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुका हा मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर अंकलेश्वर  महामार्गावरील तालुका आहे. आणि सीमावर्ती भागाला लागून चोरवड हे छोटेसे गाव आहे. यापूर्वी आरटीओ विभागाची चेक…

तापी नदीत गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क तब्बल 26 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी रावेर तालुक्यातील झुरखेडे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.15) रोजी तापी नदीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष…

कु. भूमिका यशवंत दलाल रावेर तालुक्यातून सर्वप्रथम

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर येथील सौ. कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी कू. भूमिका यशवंत दलाल हिला इ. 10वी मध्ये 97 टक्के गुण मिळाले.  तिचा रावेर केंद्रातूनच नव्हे तर रावेर तालुक्यातून पहिला नंबर आला आहे. ती…

रावेरमध्ये गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त केल्याची घटना रावेर तालुक्यातील रसलपूर गावात घडली.  छापा टाकून घटनास्थळावरून चौघांना ताब्यात घेतले, तर पोलीस येताच चौघेजण पळून गेले. या कारवाईत…

रावेरमध्ये 5.73 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर वनपरिक्षेत्रात 5.73 लाख रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई रावेर-चोरवड मार्गावर मौजे लोणी गावाजवळ करण्यात आली. दि. 5 मे रोजी गस्तीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या…

भीषण अपघात.. बाप अन् चिमुकल्या लेकाचा करुण अंत

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील बोर घाटात भीषण अपघात झाला आहे.  थार जीप आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाप आणि लेकाचा  जागीच मृत्यू झाला. पिंटू बोडोले (वय ३५) आणि त्यांचा ४ वर्षांचा चिमुकला रितिका पिंटू…

रावेरमध्ये गाव पुढाऱ्यांमध्ये ‘कुठे खुशी, कुठे गम’

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर तालुक्यात मोठ्या ग्राम पंचायती आरक्षित झाल्याने स्थानिक पातळीवर राजकारण करणारे गावपुढाऱ्यांमध्ये कुठे खुशी कुठे गम आहे. चिनावल (एसटी महीला) खानापूर (एससी महीलासाठी) राखीव झाले तर दोन्ही मोरगांवमध्ये…

कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील अहिरवाडी येथील शेतकऱ्याने कर्ज बाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ…

विहिरीतून मृतदेह काढताना आढळला मानवी सांगाडा

विहिरीतून मृतदेह काढताना आढळला मानवी सांगाडा फॉरेन्सिक पथकाची तपासणी; डीएनए चाचणीसाठी नमुना पाठवला निंभोरा बु., ता. रावेर (प्रतिनिधी): निंभोरा गावाजवळील मोठा वाघोदा रोडलगत असलेल्या शेतातील विहिरीतून आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह…

वडगावजवळ मोटरसायकल व कारची भीषण धडक; एकाचा मृत्यू, दोन गंभीर

वडगावजवळ मोटरसायकल व कारची भीषण धडक; एकाचा मृत्यू, दोन गंभीर रावेर (प्रतिनिधी) : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील वडगावजवळील सुकी नदी पुलाजवळ मोटरसायकल आणि ब्रिझा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडगाव येथील जावेद…

केऱ्हाळा येथे गौवंश मास विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल; ११० किलो मास जप्त

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील के-हाळा बु. येथील इंदिरा नगर भागात खुलेआम गौवंशाचे मास विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ११० किलो मास जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे…

रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीट

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात तापमानाचा पारा वाढला असला तरी काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रावेर शहरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला होता. तर काही सेकंद बोराएवढी गार पडली. हा पाऊस…

तरुण ट्रॅक्टर चालकाची आत्महत्या; रेल्वेखाली झोकून दिला जीव

लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर येथील रहिवासी व ट्रॅक्टर चालक सागर अशोक चौधरी (वय ३०) रा. तांदलवाडी (ता. रावेर) या तरुणाने २६ मार्च रोजी रात्री ८ ते ९ दरम्यान सुनोदा गावाजवळील रेल्वे मार्गावर स्वतःला झोकून देत जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी…

हनी ट्रॅप प्रकरणी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या महिलेला अटक

हनी ट्रॅप प्रकरणी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या महिलेला अटक रावेर:- हनी ट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेला रावेर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. एका व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करणाऱ्या या महिलेला तक्रारदाराच्या मदतीने…

अंतुर्ली बुद्रुक येथील सरपंच अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

अंतुर्ली बुद्रुक येथील सरपंच अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय भडगाव: अंतुर्ली बुद्रुक (ता. भडगाव) येथील लोकनियुक्त सरपंच उषा भाईदास कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. सन…

विजेच्या शॉकने घेतला सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा जीव

रावेर प्रतिनिधी ;- विजेचा शॉक लागून मंत्रालयातील सेवानिवृत्त आरोग्य अव्वल सचिव जमशेर समशेर तडवी (वय ६२, रा. कुसुंबा खुर्द) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही दुर्घटना काल सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली.…

रावेरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई; १६५ किलो अवैध डिंक जप्त

रावेरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई; १६५ किलो अवैध डिंक जप्त अहिरवाडी आणि जुनोना येथे तीन ठिकाणी कारवाई, दोन दुचाकीसह ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त रावेर प्रतिनिधी तालुक्यातील अहिरवाडी आणि जुनोना येथे वनविभागाने अवैध डिंक तस्करीविरोधात…

गळ्यावर विळ्याने वार करून प्रौढाची आत्महत्या

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आलीय.  वाघोड येथे ६५ वर्षीय इसमाने स्वतःच्या गळ्यावर विळ्याने वार करून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

पाल येथील हरीण पैदास केंद्रात चौदा सांबर हरीणाचा मृत्यू

पाल ता. रावेर पाल येथील हरीण पैदास केंद्रातील हरिणाची योग्य देखरेख केली जात नसल्याने मागील आठवडा भरात येथील हरीण पैदास केंद्रातील वेळेवर पुरेसा चारा पाणी न मिळाल्याने चौदा सांबर हरीण मरण पावल्याचे माहिती समोर आली आहे. आणखी काही…

रावेरमध्ये ४ लाखांच्या गुटख्यासह एकास अटक

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मध्य प्रदेशातून रावेरमार्गे फैजपूर येथे जाणारा गुटख्याचा साठा फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने धडक कारवाईत जप्त केला. या कारवाईत महाराष्ट्रात बंदी असलेला तब्बल ४ लाख १७ हजार…

रावेर तालुक्यात जीबीएस सदृश्य रूग्ण

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील थेरोळा येथील 22 वर्षीय तरुणामध्ये गिलियन बरे सिंड्रोम सदृश्य लक्षणे आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तत्काळ ॲम्बुलन्सद्वारे त्याला रावेर ग्रामीण…

तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूची उत्कृष्ट कामगिरी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल शिरसोली रोड जळगाव येथे 01/02/2025 ते 02/02/2025 रोजी पार पडल्या स्पर्धेमध्ये रावेत तायक्वांदो अकॅडमी येथील खेळाडू उत्कृष्ट अशी कामगिरी करत रावेर तालुक्याला एकूण…

माता, माती, मातृभाषा यांचा अभिमान बाळगा !

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठी भाषेला काही हजार वर्षांची परंपरा आहे. मराठीतील अभिजात साहित्य मराठी माणसांच्या मनाला संस्कारित करते. मराठी भाषा ही अमृतातेही पैजा जिंकणारी आहे. प्रत्येकाने स्वतःच्या बोली भाषेचा अभिमान…

वडिलांनी स्वत:ची किडनी देऊन वाचविले मुलीचे प्राण

खिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क  मांगलवाडी (ता.रावेर) येथील शेतमजूरी करणाऱ्या बाबूराव कोळी यांनी आपल्या २९ वर्षीय किडनी विकाराने त्रस्त झालेल्या मुलीला वाचवण्यासाठी आपली किडनी दान करत तिला जीवदान दिले. मांगलवाडी येथील रहिवासी…

वन विभागाची अवैध दारुभट्ट्यांवर कारवाई

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  वनपरिक्षेत्र यावल पूर्व भागात बोरखेडा बुद्रुक येथे चिचखोपा नाला व भवानी नाला परिसरामध्ये वन विभागाने कारवाई करत 2 अवैध गावठी दारू भट्ट्यांसह दारू साठी लागणारे रसायन धाड टाकून उद्वस्त केले आहे.…

मोटरसायकलने अचानक घेतला पेट (व्हिडिओ)

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क  येथील स्टेट बँकेच्या आवारात लावण्यात आलेल्या मोटारसायकलने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र बँक कर्मचारी यांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले व पुढील अनर्थ टाळला.…

बापरे.. पिसाळलेल्या कुत्र्याचा 11 जणांना चावा

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने रावेर शहरातील विविध भागांमधील लहान मुलांना आणि वयस्क व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा चावा घेऊन जखमी केले. यात एका लहान मुलाला अतिशय गंभीर जखम झाली असून त्या…

निंभोरा सेंट्रल बँकेत मनमानी कारभार

ऐनपूर ता.  रावेर लोकशाही न्युज नेटवर्क (इकबाल पिंजारी) निंभोरा शाखा सेंट्रल बँकेतील खातेधारकाचे दि. 23 सप्टेंबर रोजी खात्यातून विशिष्ट रक्कम कपात झाले. यांनतर खातेधाराकाने सदर कपाती बाबत दि. 07 ऑक्टोबर रोजी तक्रार अर्ज लिहून…

ऑनलाइन जुगार खेळणारी टोळी जेरबंद

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क  रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करत ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या सहा जणांच्या एका टोळीला मंगळवारी (ता. २४) छापा टाकून अटक केली. कॉल सेंटरद्वारे प्रलोभन देऊन जुगार खेळविणाऱ्या टोळीवर नाशिक विभागातील ही पहिलीच कारवाई…

कृषी तंत्र विद्यालय निंभोरा शिक्षक दिन उत्साहात साजरा

निंभोरा ता. रावेर दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी तंत्र विद्यालय निंभोरा बुद्रुक येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कृषी तंत्र विद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष प्रल्हाद बोंडे यांच्या शुभहस्ते डॉक्टर…

रावेरमध्ये सीसीआयचे 4 कापूस खरेदी केंद्र सुरु होणार

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  रावेर लोकसभा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रावेर, सावदा, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, भुसावळ, चोपडा व बोदवड तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र…

मानवाधिकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद कोळी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय प्रसिध्दी प्रमुख पुनखेडा ता. रावेर येथील रहिवासी युवा निर्भिड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद रामचंद्र कोळी उर्फ शिवाभाई यांची (Human Right…

‘कृतज्ञता यात्रे’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद !

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क पंछी पीए जल ना घटे, घटे नासरवर नीर, दान किये कर्म किये ऐसे, ना घटे पुण्य कहे दास कबीर... ज्याप्रमाणे पक्षाने पाणी पिले तरी समुद्र आटत नाही, त्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी केलेले पुण्याचे कर्म कधी घटत नाही एक…

रस्त्यासाठी प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या !

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरु झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी…

जागतिक व्याघ्र दिनी रावेर ते पाल वनक्षेत्रात जनजागृती

रावेर 29 जुलै जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव आणि वनविभाग यावल यांच्या सैयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस शालेय विद्यार्थ्यासोबतच गावकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. 28…

नंदकिशोर महाजन यांच्याकडे मोठी जबाबदारी

खिर्डी | लोकशाही न्यूज नेटवर्क नंदकिशोर भागवत महाजन तांदलवाडी ता रावेर यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपा पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. नंदू महाजन हे नाव सर्व तालुकाच नव्हे तर जिल्यातील भाजपाचे एक खंबीर, कुशल नेतृत्व…

आ. शिरीष दादा चौधरी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र…!

लोकशाही संपादकीय जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष दादा मधुकरराव चौधरी यांचे नाव नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ‘क्रॉस वोटिंग’ करणाऱ्या…

पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटखासह ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क  रावेर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करत वाहनासह सुमारे ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलीस…

बंद कुलरमध्ये करंट उतरल्याने तरुणाचा मृत्यू

रावेर |लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यात अजंदे येथे कुलरमध्ये पाणी टाकत असतांना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रावेर तालुक्यातील अजंदे येथील रहिवासी…

रावेर मतदार संघात काँग्रेसतर्फे धनंजय चौधरीची एन्ट्री..!

लोकशाही संपादकीय लेख  नुकताच खिरोदा येथील लोकसेवक कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त कृतज्ञता सोहळा पार पडला. कृतज्ञता सोहळ्याचे निमित्त साधून अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या काळात जीवावर…

सावधान : सर्रास साग वृक्षांची कत्तल : आरोपीवर कारवाई

पाल ता. रावेर लोकशाही न्यूज नेटवर्क  दहा दिवसांपूर्वी यावल वन्यजीव अभयारण्यातील पाल वन्यजीव वनपरिक्षेत्र निमड्या पासून तीन किमी अंतरावरील वन्य जीव वनहद्दित कक्ष क्र. ५२ मधिल राखीव वनक्षेत्रातअतिक्रमणाच्या…

वाळू वाहतूक करणारा आयशर पकडला

रावेर | लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर तालुक्यात रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू वाहतूक होत असल्याने रावेर महसुल विभागाने कारवाई करत वाळूने भरलेला आयशर ट्रक पकडला आहे. या करवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या…

सुगरण पक्षांची घरट्यांसाठी धांदल..

रावेर  अरे, खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला.. सुगरण पक्षांच्या घरट्यांवर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता किती सार्थ आहे, याचा प्रत्यय सुगरण पक्षाची आपले घरटे…

मानेवर विळ्याने जीवघेणा वार : तरुण गंभीर जखमी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क    रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथे तोल काट्यावर कामगारांमध्ये वाद होऊन मानेवर विळ्याने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या बाबत रावेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

१० हजारांची लाच भोवली, PSI एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क १० हजारांची लाच घेताना रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. कैलास विश्वनाथ ठाकूर (वय ५६) असे कारवाई झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.…

धक्कादायक: पतीच्या पाठोपाठ पत्नीचीही झाडाला गळफास घेवून आत्महत्या

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क  एका धक्कादायक घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे. पतीने नदीकाठच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. तर दुसऱ्याच दिवशी पत्नीने देखील शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

…तर रक्षा खडसे होणार केंद्रात मंत्री ?

जळगाव (दीपक कुळकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून जळगाव व रावेर मतदारसंघावर भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला कडवी झुंज देण्यात आली असून त्यात भाजपाने मोठे यश…

‘एक्झिट पोलचे अंदाज’ : महाराष्ट्रात काय होणार ?

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभा निवडणुकीची सातवी फेरी आटोपली आणि विविध संस्था तसेच टीव्ही चॅनलच्या वतीने एक्झिट पोलद्वारे अंदाज व्यक्त केला जात आहे. एक्झिट पोलचे अंदाज किती खरे किती खोटे, याची विश्वासार्हता किती आहे? काही टीव्ही चॅनलनी…

अखेर रुपेश सातव्या दिवशी आईच्या कुशीत परतला; रावेर पोलिसांच्या कार्याची वाहवाही..

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सात दिवसांपूर्वी वाघोड ता. रावेर येथून घरात काहीही न सांगता आठ वर्षाचा रुपेश भगवान बारेला हा मुलगा निघुन गेला होता. याबाबत रावेर पोलिस स्टेशन येथे हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

मोठे वाघोदा येथे यंत्रणेकडून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण

जळगाव ;- मोठे वाघोदा तालुका रावेर येथे कॉलरा आजाराची लागण झाल्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली जिल्हा परिषदचे सर्व संबंधित विभाग प्रमुख व सर्व यंत्रणा यांनी आज वाघोदा येथे संपूर्ण पिण्याच्या पाण्याचे…

विहिरीत पडल्यामुळे नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू

रावेर;-  पाणी भरण्यासाठी गेलेल्या नववर्षीय बालिकेचा पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लाल माती येथे घडली. सुरलीबाई रमेश बारेला असे मृत बालिकेचे नाव असून ती लाल माती येथे रमेश बारेला, मनीषा बारेला ,रेणू…

रावेर शेतकऱ्यांसाठी निसर्गाचा जणू शापच..!

लोकशाही संपादकीय लेख ‘नेमेची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे रावेर तालुक्याच्या नशिबाने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्यात तसेच इतर मौसमात अवकाळी वादळ, वारा आणि पावसाचा तडाका शेतकऱ्यांसाठी काळ ठरला आहे, असे…

रावेरात घरफोडी ; सव्वा लाखांचे दागिने रोकड लांबविली

रावेर;- एका वृध्द महिलेचे बंद घर फोडून सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण मुद्देमाल चोरूननेल्याची घटना शिक्षक कॉलनीमध्ये उघडकीस आली असून याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्यवती देवीदास तायडे वय ६५ या वृध्द…

 दिव्यांग तरुणीचा विनयभंग करणाऱ्या एकाला अटक

रावेर : घरात एकट्या असलेल्या तरुणीच्या घरात शिरुन तीच्यासोबत अश्लिल वर्तन करीत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात संजू हैदर तडवी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयिताला पोलिसांनी…

बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्ग सौंदर्याचा अनुभव

पाल ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या 23 मे रोजी बुध्द पौर्णिमेच्या येऊ घातली असून त्यानिमित्ताने…

जळगाव जिल्ह्यात भाजप गड कायम राखणार..?

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत १३ मे रोजी जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०२४ साठी दोन्ही मतदार संघात दोन टक्क्यांनी मतदान वाढले…

टक्केवारीचे ‘उड्डाण’ कुणाला देणार ‘भरारी’?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोमवारी चौथ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. यात गेल्या वर्षीपेक्षा जळगाव लोकसभा मतदार संघातील टक्केवारीत वाढ दिसून आली. यंदा जळगावमधील मतदानाची टक्केवारी 58 टक्के इतके आहे.…

जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ३६० मतदारांची वाढ -आयुष प्रसाद

जळगाव ;-- १३ मे रोजी झालेल्या रावेर आणि जळगाव लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतदार संख्या वाढीत जळगाव किल्ह्याचा समावेश झाला असून जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ३६० मतदारांची वाढ म्हणजेच ७. ९१ टक्के झाली असून तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास…

जळगाव मतदार संघात ५१. ९८ टक्के तर रावेर मतदार संघात ५५. ३६ टक्के पाच वाजे पर्यंत मतदान

जळगाव ;- जळगाव शहर विधानसभा मतदार संघात ४९. ५० टक्के आणि अमळनेर विधानसभा संघात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी सर्वात कमी मतदान झाले असून सर्वाधिक मतदान जळगाव ग्रामीण मतदार संघात ५५. ७९ आणि एरंडोल ५५. ८४ इतके सर्वाधिक असे एकूण ५१. ९८ टक्के…

विकसित भारतासाठी मोदींचे हात बळकट करा – गिरीश महाजन

जळगाव ;- लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याबाबत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "विकसीत भारत करण्यासाठी लोकसभा निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यात सोमवारी…

रावेर ,जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान

१७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती १५९३ वाहनांची सोय मोठा पोलीस बंदोबस्त तैनात जळगाव;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी उद्या दि.१३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या…

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा ; प्रशासनाकडून विविध सुविधा

जळगाव ;- जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विविध स्वरूपाच्या सुविधा जिल्हा…

आईच्या विजयासाठी मुलगी उतरली मैदानात!

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क- भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे गेल्या दहा वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यंदा त्यांना तिसऱ्यांदा भाजपाने उमेदवारी दिली असून आर्इच्या विजयासाठी रक्षा…

सावदा येथे रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ रॅली

रावेर, लोकशाही न्युज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ सावदा येथे रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवार दि. 8 रोजी सकाळी…

केळी उत्पादक शेतकऱ्याची व्यथा कुणाला कळणार का…?

मोरगांव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकरी 12 महिने रात्रंदिवस केळीला पाणी भरून राब राब राबून मेहनत घेतो व एका 20 किलो घडाचे 6 रुपये किलो × 20 किलोचा घड म्हणजे 120 /- एका घडाचे शेतकऱ्याला मिळतात. यात घड वाहतूक करणे व पत्ती खर्च…

लोकसभेच्या मैदानात 38 उमेदवार रिंगणात!

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगावसह रावेर लोकसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी दोघा मतदारसंघात एकूण 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर रावेरातून पाच अपक्ष उमेदवारांनी…