सफाई कर्मचाऱ्यांचे रावेर पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण…..!

0

मोरगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी निंभोरा बु.ता. रावेर हे मंगळवार दिनांक 28/ 11/ 2023 पासून रावेर पंचायत समिती समोर त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. मागणी नं (दि. 10 ऑगस्ट 2020) चे सुधारित वेतनमानुसार परिमंडल दोनचे अकुशल कर्मचारी किमान वेतन 12700रुपये लागू करणे, मागणी नं:-2, (दि.01 जुलै 2023) नुसार राहणीमान भत्ता लागू करणे, मागणी नं:-3 (दि 03 ऑगस्ट 2020) पासून किमान वेतन व राहणीमान भत्ता फरकासहित देण्यात यावा. त्याप्रमाणे मागण्या आहेत. या ठिकाणी उपोषणास उत्तम भलाराम सप्रेबन, देवेंद्र जोहरजी आदिवाल, रजनी उत्तम सप्रेबन, सुनंदा देवेंद्र आदिवाल, इत्यादी कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 682 विजय रल( महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष) तसेच अखिल भारतीय सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना नागेश कंडारे(अध्यक्ष), रेखा बहनवाल (कार्याध्यक्ष), प्रशांत आदिवाल (जिल्हाध्यक्ष), दिलीप पंडित (रावेर तालुका अध्यक्ष) यांनी सुद्धा या कर्मचाऱ्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.