Wednesday, August 17, 2022

मशागतीला प्रारंभ; पावसाचा अंदाज घेत नियोजन

लोकशाही न्यूज नेटवर्क

परंपरागत पद्धतीने मशागत करणे परवडत नसल्याने अलीकडे शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीने मशागत करत आहे. कमी वेळात आणि चांगली मशागत होत असल्याने शेतकऱ्यांची पसंती यांत्रिक पद्धतीने मशागतीकडे आहे. मात्र, आता डिझेलचे दर आकाशाला भिडले असून, शेतीची मशागत महागली आहे.

अक्षय तृतीयेपासून शेतकऱ्यांनी मशागतीला प्रारंभ केला असून महागाईचा फटका बसत आहे. ट्रॅक्टरने मशागतीसाठी ट्रिलर प्रति एकर १२०० रुपये दर आहे. तर नांगरीनी प्रति एकर १३०० रूपये दर आहे. केवळ इंधन दरवाढीमुळे एकरी पाच ते सहा हजारांचा फटका बसत आहे. सध्या शेतात शेणखत घालण्याचे काम सुरू आहे. पशुपालकांनी पावसाळ्यासाठी चाऱ्याची व्यवस्थाही सुरू केली आहे. रब्बी पीक घेतलेल्या शेतात नांगरटी सुरू झालेली आहे. शासनाने शेतकऱ्यांकरिता अनुदानावर इंधनाची व्यवस्था करावी. महागड्या इंधन दरवाढीने शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकरी- राजु शिरसाठ, वाकोद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या