जळगाव – डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव. येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न,विश्वभूषण, बोधिसत्व, योग पुरुष, अर्थतज्ञ,अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉ.ए.पी. चौधरी (संशोधन संचालक) कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे व तसेच कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रवीण देवरे , व कृषी महाविद्यालय शाहादा येतील वरिष्ठ पर्यवेक्षक ए बी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी व तीनही महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी, विध्यार्थीनीं उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करण्यात आले व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सपकाळे यांनी त्रिशरण व पंचशील घेऊन कार्यक्रम चे सुरुवात केली. व डॉ. शैलेश तायडे यांनी महापुरुषाच्या जीवनाच्या कार्यावर प्रकाश टाकले आणि त्यांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. गोणशेटवाड बी.एम. यांनी केले.