सावधान! शॉरमा खाल्ल्याने १९ वर्षीय मुलाचा मृत्यू ; विक्रेत्यावर गुन्हा

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक क्रियाकलाप करतो. आणि आपली भूक तहान भागवतो. मात्र मुंबईत शॉरमामधून विषबाधा झाल्यामुळे एका १९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील मानखुर्द भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश भोकसे असे मयताचे नाव आहे.

शॉरमा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरमध्ये राहाणाऱ्या प्रथमेश भोकसे याने त्या भागातील एका स्टॉलवर शॉरमा खाल्ला. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्या ठिकाणी शॉरमा खाणाऱ्या इतर दहा ते बारा जणांना त्रास सुरु झाला. या लोकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. प्रथमेशला शुक्रवारी तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरु असताना त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू होताच शॉरमा विक्रेत्याविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी अन्नपदार्थांची रस्त्याच्या बाजूला खुलेआम विक्री होते. परंतु त्यांच्याकडे संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका लक्ष देत नाही. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचारी त्याकडे पाहत सुद्ध नाही. यामुळे विषबाधासारखा प्रकार घडत असतो. या प्रकाराची दखल घेऊन बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

खराब शॉरमा खाल्ल्याने प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. शॉरमातील चिकन खराब असल्याचा पोलिसांना संशय आहे. ट्रोम्बे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक केली आहे. त्या लोकांनी शॉरमासाठी लागणारे मांस कुठून आणले होते, त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.