Wednesday, September 28, 2022

प्रियकराचा लग्नाला नकार; प्रियसीने केला चाकूने वार

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisement -

नागपूर : प्रियसीने केला चाकूने वार. लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर प्राणघातक हल्ला चढवून चाकूने वार केले. ताे जखमी अवस्थेत घराबाहेर पळाल्याने बचावला. आराेपी प्रेयसी ही घटस्फाेटित असल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली असून, तिला अटक करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले. ही घटना वाडी शहरातील दत्तवाडी परिसरात साेमवारी (दि. १७) रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास दिली.

अक्षय कृष्णाजी ढोके (२७, रा. गुरुप्रसादनगर, दत्तवाडी, वाडी) असे जखमी प्रियकराचे नाव असून, ताे वाडी परिसरातील बिस्कीट कंपनीमध्ये नाेकरी करताे. ताे दत्तवाडी परिसरात किरायाने राहताे. त्याचे ३० वर्षीय महिलेशी दाेन वर्षांपासून प्रेमसंबंध हाेते. ती घटस्फाेटित असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. काही कारणांमुळे महिनाभरापासून त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाल्याने अक्षयने तिच्याशी असलेले मैत्रीचे संबंध ताेडले हाेते. त्यामुळे ती संतापली हाेती.

ती साेमवारी रात्री अक्षयच्या खाेलीवर गेली आणि तू माझ्याशी मैत्री का ताेडली, लग्न करण्यास नकार का दिला, अशी अक्षयला विचारणा करीत त्याच्याशी भांडायला लागली. याच भांडणात तिने अक्षयवर चाकूने वार केले. त्यामुळे स्वत:ला वाचविण्यासाठी वाचवा-वाचवा ओरडत बाहेर पळला. त्यातच परिसरातील दुकानदार व इतर नागरिक त्याच्या मदतीला धावले.

त्यांनी अक्षयला लगेच वाडी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. माहिती मिळताच पाेलिसांनी अक्षयला गाठून त्याचे बयाण नाेंदवून घेत प्रेयसीविरुद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकव्हर करीत आहेत.

अक्षयने मैत्रीचे संबंध ताेडल्याने त्याची प्रेयसी चिडली हाेती. काही दिवसांपूर्वी तिने अक्षयच्या आईशी माेबाइल फाेनवर संपर्क करून तुमच्या मुलाने माझ्याशी मैत्री का ताेडली, अशी विचारणा करीत अक्षयला पाहून घेण्याची धमकी दिली हाेती, अशी माहिती त्याच्या आईने दिली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या