जळगावातील ज्वेलर्स दुकानातून अज्ञात महिलेने अंगठ्या लांबविल्या

0

जळगाव ;- शहरात असणाऱ्या सुभाष चौकातील एका ज्वेलर्समध्ये अज्ञात महिलेने अंगठी घेण्याचा बनाव करीत १२ सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, योगेश पंढरीनाथ सुवर्णकार वय-३८, रा.गणेश कॉलनी, जळगाव यांचे सुभाष चौकातील भवानी माता मंदिराजवळ शुभ लाभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दरम्यान रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता योगेश सुवर्णकार हे दुकानात असताना १ अनोळखी महिला सोन्याची अंगठी घेत असल्याचा बनाव करत दुकानात आली.

त्यानंतर अनोळखी महिलेने हात चालाखी करून तब्बल १ लाख ७७ हजार ४०० रुपये किमतीच्या १२ सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर सोन्याची व्यापारी योगेश सुवर्णकार यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.