लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार

0

अमळनेर ;- लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद घालत तरूणावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना झामी चौकात शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता घडली असून याप्रकरणी रविवारी २१ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील झामी चौकात फिरद शेख गुलाम नबी वय २३ हे राहायला असून शनिवारी २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या गल्लीत लहान मुलांच्या खेळण्यावरून फिरद शेख याच्यासोबत कामील अफजल खान पठाण याने वाद घातला. त्यानंतर या वादातून हाणामारीला सुरूवात झाली. यात फिरद शेख गुलाम नबी या तरूणाला गल्लीत राहणारे कामील अफजल खान पठाण, युसूफ अफजल पठाण, नाजीया युसूफ पठाण, रूखसाना अफजल पठाण आणि अफजल गुलाब खान पठाण यांनी शिवीगाळ करत मारहाण कोयता मारून जखमी केले. जखमी झालेल्या फिरदला तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रविवारी २१ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.