नाचण्याच्या कारणावरून चौघांना मारहाण

0

जळगाव ;-तालुक्यातील तरसोद गावातील बस स्थानकाजवळ हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून चौघांना लाठी काठ्यानी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी २० एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून सागर शांताराम राजपूत वय-२९ या तरुणाला गावात राहणारे प्रवीण भगवान अलकारी, विनोद भगवान अलकारी, सागर विनोद अलकारी आणि संतोष तुळशीराम राजपूत या चार जणांनी लोखंडी पाईप, लाकडी दांडका आणि विटा मारून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. तरुणाला मारत असताना भांडण सोडवण्यासाठी आलेले धीरज रमेश राजपूत, गिरीश बापू राजपूत आणि योगेश अशोक राजपूत यांना देखील लाकडी दांड्याने व विटांनी मारहाण करून दुखापत केली आहे. दरम्यान या घटनेबाबत राविवार २१ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय आलियार खान हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.