वडिलांसह लहान भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

0

जळगाव : गावात नेहमी भांडण करतो म्हणून वडीलकीच्या नात्याने वडीलांसह लहान भावाने मोठ्या मुलाच्या चापटा मारल्या. त्याचा राग मनात धरुन बसलेल्या मोठ्या मुलाने निलेश आनंदा पाटील (रा. नांद्रा. ता. जामनेर) याने वडीलांचे तोंड दाबून चाकूने वार केले. याचवेळी वडीलांना वाचविण्यासाठी आलेल्या लहान भावाला देखील चाकूने भोसकून दुहेरी खून केल्याची घटना जामनेर तालुक्यातील नांद्रा गावात घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने मारेकरी निलेश पाटील याला दोषी ठरवित त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

जामनेर तालुक्यातील नांद्रा गावात आनंदा कडू पाटील हे वास्तव्यास होते. त्यांचा मोठा मुलगा निलेश हा ट्रॅव्हल्सवर चालक होता तर लहान मुलगा महेंद्र हा चटई कंपनीत कामाला होता. दि. ११ जुलै २०२० रोजी महेंद्र हा पत्नीसह आपल्या गावी मुक्कामी गेला होता. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास त्याचा मोठा भाऊ निलेश याने घराजवळ राहणाऱ्या पांडुरंग सोनवणे यांच्यासोबत वाद घातला. यावेळी लहान भाऊ महेंद्र याने मोठ्या भाऊ निलेश याला समजावून घरी आणले. त्यानंतर वडीलकीच्या नात्याने निलेश याला गावात नेहमी भांडण करतो म्हणत वडीलांसह लहान भावाने दोन-चार चापटा मारल्या.त्यानंतर सर्वजण झोपून गेले होते. दरम्यान, आनंदा पाटील हे पत्नीसह घराच्या बाहेर ओसरीवर खाट टाकून झोपलेले असतांना निलेश याने त्याच्या वडीलांचे तोंड दाबून हातातील चाकूने भोसकून खून केला. हे बघून त्याच्या आईने ओरडून भैय्या पळ असा आवाज दिला. तो आवाज ऐकून महेंद्र हा पत्नीसह खोली बाहेर आला असता, त्याच्या भावाने वडीलांचे तोंड दाबले होते आणि त्यांच्या तोंडातून रक्त निघत असल्याचे दिसले.

 

वडीलांसह लहान भावाचा खून केल्यानंतर मारेकरी निलेश हा हातात रक्ताने माखलेला चाकू घेवून पोलीस पाटील यांच्याघरी गेला. त्याने मी माझ्या बापाचा आणि भावाचा खून केला असून तुम्ही घराकडे चला असे त्याने सांगितले. यावेळी पोलस पाटील यांनी घटनेची खात्री केली. दरम्यान, मारेकरी निलेश हा गावातील लोकांना माझ्याजवळ येवूनका तुम्हाला मारुन टाकीन अशी धमकी

देखील देत होता.

हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या न्यायालयात चालला. यावेळी एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये घटनास्थळावरील पुराव्यांसह प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरीत मारेकरी निलेश पाटील याला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्रसैंदाणे यांनी काम काज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.