चोरीची दुचाकी घेवून फिरणारा चोरटा जेरबंद

0

जळगाव: -चोरलेल्या दुचाकीवर न अजिंठा चौफुली परिसरात फिरणाऱ्या महेश राजेश गायकवाड (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळत्या, त्याच्याकडन चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

मेहरुण परिसरातील राहुल संजय वाघ हे त्यांच्या (एमएच १९, डोएल १५९४) क्रमांकाच्या दुचाकीने पांडेडेअरी चौकातील पोस्ट ऑफिस येथे गेले होते. यावेळी त्यांची दुचाकी दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरलेली ही दुचाकी घेवून संशयित महेश गायकवाड हा घेवून फिरत आहे. दरम्यान, त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकों गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, सचिन पाटील, विनोद आस्कार, साईनाथ मुंडे, चंद्रकांद पाटील यांचे पथक तयार करुन संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसा पथकाने संशयित महेश गायकवाड हा चोरीची दुचाकी घेवून अजिंठा चौफुली परिसरात येताच त्याच्या मुसक्या आवळाल्या त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे, पुढील कार्यवाहीसाठी त्याला जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.