रायपूर ;-मुलीशी लग्न ठरवून ते मोडल्याचा राग मानत ठेऊन एका तरुणाने छत्तीसगड राज्यातील सारंगड जिल्ह्यातील थरगावमध्ये एकाच कुटूंबातील पाच लोकांची हातोडा व छन्नीने वार करून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. मृतांमध्ये हेमलाल (५२), जगमती (२७ वर्ष), मीरा आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयापासून जवळपास २२ किलोमीटर दूर सलीहा थाना क्षेत्रातील थरगाव येथे ही घटना घडली. येथे एकाच कुटूंबातील ५ लोकांची हत्या करण्यात आली. सांगितले जात आहे की, आरोपी तरुणाचे या घरातील तरुणीसोबत लग्न ठरवले होते. मात्र काही कारणामुळे घरच्या लोकांनी लग्नास नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या तरुणाने मुलीच्या घरातील सर्व सदस्यांची हत्या करून स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बिलाईगड-सारगड जिल्ह्याचे एसपी यांनी पोलीस व फॉरेंसिक टीम घटनास्थळी रवाना केली.