दिव्यांग तरुणीचा विनयभंग करणाऱ्या एकाला अटक

0

रावेर : घरात एकट्या असलेल्या तरुणीच्या घरात शिरुन तीच्यासोबत अश्लिल वर्तन करीत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात संजू हैदर तडवी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

रावेर तालुक्यातील एका गावात दिव्यांग तरुणी वास्तव्यास आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही तरुणी घरात एकटी असतांना संशयित संजू तडवी याने खिडकीतून तरुणीच्या घरात प्रवेश केला. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिला धमकी दिली. या प्रकरणी या युवतीने रावेर पोलीस स्टेशनला सदर इसमाविरुध्द विरूध्द विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.