यावल येथे ३० हजाराचा गुटखा जप्त

0

यावल : येथील ख्वाजा नगरातील रहिवासी शेख फारूक शेख युसुफ हा मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या विमल गुटख्यासह सुगंधित तंबाखूचा साठा जवळ बाळगत असून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती येथील पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाल्यावरून यावल पोलीस पथकाने छापा मारला असता २९ हजार ५८८ रुपयाचा विमल गुटख्यासह सुगंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केला असून शेख फारूक याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, येथील ख्वाजा नगरातील रहिवासी एक फारुख शेख युनूस हा इसम स्वतःचे कब्जात मानवी आरोग्यास अपायकारक असलेला विमल गुटखा व सुगंधित तंबाखू स्वतःचे कब्जात बाळगत असून त्याची चोरटी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हेड कॉन्स्टेबल उमेश सानप, पो.ना. वसीम असलम तडवी यांना ख्वाजा नगरातील शे. फारूख शे. युसुफ याचे कडे जाऊन खात्री करून कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यावरून पथकाने शे. फारूख त्याचे कडे छापा टाकला असता सुगंधी तंबाखू सह विमल गुटख्याची वीस रुपये किमतीची १५० पाकिटे असा २९ हजार ५८८ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पो. ना. वसीम असलम तडवी यांचे फिर्यादीवरून शेख फारुख याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फौजदार मोरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.