शेतकऱ्याच्या घरातून लांबविला ३० हजारांचा मुद्देमाल

0

अमळनेर ;- एका शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शहरातील मुंदडा नगरात शनिवारी ४ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आले आहे याप्रकरणी रविवारी ५ मे रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक तुकाराम पाटील वय-५१, रा. मुंदडा नगर, अमळनेर हे आपल्या परिवारासह राहायला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. ३ मे रोजी रात्री १० वाजता ते कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे संधी साधून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी शनिवारी ४ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आला. दरम्यान अशोक पाटील यांनी रविवार ५ मे रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. हे. कॉ. प्रमोद पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.