अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तरुणाला १५ वर्षांचा सश्रम कारावास

0

अमळनेर : आईवडील शेतात गेल्यावर अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या धीरज रवींद्र फुगारे (वय २०, रा. गोरगावले, ता. चोपडा) या तरूणास अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षाचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीचे आई, वडील व आजोबा येथे शेतात तूर कापण्यासाठी गेले असता, अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. दरम्यान, धिरज फुगारे या तरुणाने मुलीच्या घरात प्रवेश करीत तिला तू मला फोन का लावत नाही अशी विचारणा केली. तसेच त्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. ६ जानेवारी २०२२ रोजी घडली होती. यावेळी तरणाने मुलीला मारहाण केल्यामुळे ती अल्पवयीन मुलगी जखमी देखील झाली.

होती. सायंकाळी मुलीचे आई वडील घरी आले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. मुलीला उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दवाखाण्यातच पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी धीरज फुगारे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी केला..

अकरा साक्षीदारांची साक्ष ठरली महत्वपुर्ण

हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. खटल्यात ११ साक्षीदार तपासले सरकारी वकील अॅड. शशिकांत पाटील यांनी यात ११ साक्षीदार तपासले. पीडिता, तिची आई, डॉ. गुरुप्रसाद, डॉ. पंकज पाटील, डॉ. पवन पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून न्या. पी. आर. चौधरी यांनी आरोपी धीरज फुगारे याला शिक्षा सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.