जळगावात ३० वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल

0

जळगाव ;– राहत्या घरात एका तीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना आज शनिवार १८ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास  रामानंद नगर परिसरातील म्युन्सिपाल कॉलनी येथे उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे . याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पराग अनिल ठोंबरे (वय-३० रा. मुन्सिपल कॉलनी, रामानंद नगर परिसर, जळगाव) असे मयत युवकाचे नाव आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, मुन्सिपल कॉलनी येथे पराग ठोंबरे हा आई लता, पत्नी शितल, तीन वर्षाचा मुलगा शंभू आणि एक विवाहित बहीण यांच्यासह वास्तव्याला होता. फोटोग्राफीचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान शुक्रवारी दि. १७ मे रोजी रात्री परागने कुटुंबासह जेवण केले व झोपला. त्यानंतर मध्यरात्री त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता त्याची आई लताबाई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी एकच आक्रोश केला.

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्याला खाली उतरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. आत्महत्ये कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.