फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

0

मुक्ताईनगर-;- ओळखीचा फायदा घेऊन विवाहितेशी सलगी वाढवून तिचे फोटो काढत ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मुक्ताईंनगर तालुक्यातून समोर आली असून या प्रकरणी एकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आसीफ मुश्ताक खाटीक या तरूणाची समोरच्या घरात वास्तव्यास असलेल्या तरूणीच्या नणंदेला बहिण मानत असे. यामुळे त्यांच्या घरात आसीफचे येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने त्या विवाहित महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क वाढविला. यानंतर त्याने काही फोटो काढले. हे फोटो एडिट करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी तो त्या विवाहित महिलेला देऊ लागला. यातून धमकी देत त्याने १७ एप्रिल आणि २८ एप्रिल रोजी बळजबरी करून शारीरीक अत्याचार केले.

यानंतर, तो पुन्हा धमक्या देऊ लागला. दिनांक ३ मे २०२४ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आसीफ खाटीक हा या महिलेच्या घरी येऊन बळजबरी करू लागला. याप्रसंगी विवाहितेचे कुटुंबिय जागी झाल्याने तो पळून गेला. या महिलेच्या कुटुंबियांनी तिला विश्‍वासात घेऊन सर्व माहिती घेतल्यानंतर आसीफ मुश्ताक खाटीक याच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.