हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या ; तीन जणांना अटक

0

ओटावा ;- कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्याचा दावा केला आहे. या तीन मारेकऱ्यांनी हरदीप सिंग निज्जरची हत्या केली असून ते भारतीय असल्याचंही कॅनडा पोलिसांनी स्पष्ट केलं. करणप्रीत सिंग कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावं असल्याचं कॅनडा पोलिसांनी स्पष्ट केलं. या पकडण्यात आलेल्या आरोपींची फोटोही कॅनडा पोलिसांनी प्रसिद्ध केली. या तिघांना अल्बर्टाच्या एडमंटन शहरातून अटक करण्यात आल्याची माहिती कॅनडा पोलिसांनी दिली आहे.

हरदीप सिंग निज्जरचे मारेकरी पकडल्याचा दावा : कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या करणाऱ्या आरोपींना 3 मे रोजी अटक करण्यात आल्याची माहिती कॅनडा पोलिसांनी दिली. या तीन आरोपींना सरेच्या  इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीमनं शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. ब्रिटीश कोलंबिया, अल्बर्टा आरसीएमपी आणि एडमंटन पोलीस यांच्या संयुक्त पथकानं 3 मे रोजी सकाळी ही कारवाई केली, अशी माहिती दिली.

पोलिसांनी जारी केली तीन आरोपींची छायाचित्रं : कॅनडा पोलिसांनी हरदीप सिंग निज्जर याच्या मारेकऱ्यांची छायाचित्रं जारी केली. या तीन आरोपींनी हरदीप सिंग निज्जरची हत्या केली. हत्या करण्यापूर्वी सरे आणि आसपास जी कार वापरली होती, त्या कारचे फोटोही जारी करण्यात आले आहेत. याबाबत शुक्रवारी पत्रकार परिषदेत हरदीप सिंगच्या हत्येविषयीची माहिती आरसीएमपीचे सहायक आयुक्त डेव्हिड तेबोल यांनी दिली. तेबोल म्हणाले, “हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी तीन संशयित मारेकऱ्यांना अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.