दहावीचा ९५.८१ टक्के निकाल जाहीर ; कोकण विभाग ठरला अव्वल

0

पुणे ;- दहावीचा निकाल  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेजाहीर केला असून यात कोकण विभागने यंदाही अव्वलस्थानी कायम राखले असून तर नागपूर विभागाने ९४.७१ टक्के निकालासह सर्वात कमी निकाल लागल्याची नोंद केली आहे.दहावीच्या निकालात यंदा पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची पास झालेल्यांची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ इतकी आहे. यामुळे पुन्हा एकदा मुली आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करण्यात आली.

यंदा दहावीचा ९५.८१ टक्के इतका निकाल लागला आहे. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण होणार्‍यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. यात कोकण विभागाचा तब्बल ९९.१ टक्के इतका निकाल लागला असून हा विभाग पुन्हा एकदा अव्वलस्थानी आलेला आहे. तर नागपूर विभागाने ९४.७१ टक्के निकालासह सर्वात कमी निकाल लागल्याची नोंद केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.