जिल्ह्यात १७५४ हेक्टरवरील केळीचे नुकसान

0

जळगाव : -जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वा- यामुळे जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव या पाच तालुक्यातील केळी, पपई पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या पाच तालुक्यात केळीसह इतर पिकांचे १७५४ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि जळगाव या पाच तालुक्यात केळी, पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात फटका बसला असून या पिंकांचे जिल्हा प्रशासनाकडून आज तातडीने पंचनामे करण्यात आले आहे. १७५ शेतर्कयांपैकी दहा गावांमध्ये पिकाचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

काही दिवसापासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने वाढत्या तापमानात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्या.अलीकडच्या काळात केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक अक्षरश: निराश झाले आहेत. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस झाला.

या वादळात हजारो हेक्टर जमीनीवरील केळीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या जोरदार वादामुळे काही ठिकाणी घरावरील पत्र उडाले. दरम्यान, या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांनी भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.