सावद्यात जुगार अड्ड्यावर छापा ; ९ जुगारी ताब्यात

0

सावदाः- येथील बसस्थानक परिसरात पत्रा शेडच्या मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची गोपणीय माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन मोटरसायकलसह नऊ जणांना ताब्यात घेतल्याची घटना दि २५ शनिवार रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडल्याने सावदा परिसरात खळबळ गेल्या अनेक दिवसापासून सावदा बस स्थानक परिसरात पत्रे शेळच्या मागील मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक जलदर पळे यांना मिळाल्याने याचे मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिसानी सापळा रचून दोन मोटरसायक ल व मोबाईल जुगाराचे साहित्यासह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संजय लक्ष्मण चौधरी वय ५० रा. स्वामी नारायण नगर, रोहीत चंद्रकांत सन्यास वय २३ रा. आंबेडकर नगर , तब्ली या रशिद तडवी वय-४२. रा. काझीपूरा, सुनिल धनराज चौधरी वय ४३. भोईवाडा रावेर, अशोक प्रलाद खुदे वय ४५ रा. विवरा, संदीप कोळी रा. कोचुर, विशाल कोळी रा सावदा, बबलू कासार रा सावदा, श्वानरोख उर्फ इम्मो यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. एक लाख ९० हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली, जुगार खेळतांना ११ हजार २०० रुपये, ११ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल असे साहित्य पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.