महापालिकेच्या ३६४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

0

जळगाव : मनपाच्या ३६४ सेवानिवृत्तक र्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या सेवानिवृत्ती वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून कर्मचाऱ्यांचे रखडलेले सेवा उपदान, मृत्यू प्रदान उपदान, नियमित पेंन्शन, अर्जित रजा रोखीकरणाच्या रक्कमा अदा करण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

तत्कालिन पालिकेच्या कार्यकाळात सन १९९१ ते १९९७ दरम्यान झालेल्या कर्मचारी भरतीवर विशेष लेखा परिक्षणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. यामध्ये ११८७ कर्मचाऱ्यांची भरती नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे यापैकी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित पेन्शन लागू करण्यात आलेली नसून तात्पुर्ती पेन्शन लागू करण्यात आली. होती. तसेच अर्जित रजा रोखीकरण व उपदानाच्या रक्कमा देखील थांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मनपाचे लेखा परिक्षक, मुख्य लेखाधिकारी यांच्या समन्वयाने शासनदरबारी पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांवरील आक्षेप दूर केले. त्यामुळे कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून सर्व कार्यरत कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता ६१० पैकी ३६४ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन

आयोग लागू करण्यात आला असूनकोटी ४८ लाख रूपयांचे सुधारीत पेन्शन सेवानिवृत्तांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. यात प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात दोन ते चार हजारांपर्यंत वाढ झाल्यामुळे सेवानिवृत्तांच्या वेतनावर १८ लाख रूपयांचा अधिक खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सहाव्या वेतन आयोगानुसार ३ कोटी ३० लाख रुपये इतके पेन्शन अदा करण्यात आले होते. त्यात आता सातव्या वेतन आयोगानुसार १८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.