सुवर्ण कारागिराने केला १२ लाख ८० हजारांच्या सोन्याचा अपहार ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;-आरसी बाफना ज्वेलर्सतर्फे एका सुवर्ण कारागिराला दागिन्यासाठी दिलेल्या २८७. ४३० ग्राम वजनाच्या दागिन्यांपैकी १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे एकूण १९५. १३० ग्राम वजनाचे सोने कमी आढळून आल्याने एकाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पेंद्र उर्फ सुदीप शेखर बेरा (वय-४४, रा. मालंचा बेंनियाजोला, खानाकूल-१, पश्चिम गोषपूर, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे बंगाली कारागिराचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील आर.सी. बाफना ज्वेलर्स दालनातील कारागिर पुष्पेंद्र बेरा याच्याकडे २८७.४३० ग्रॅम सोन्याचे मटेरिअल दिले होते. ४ मे रोजी स्टॉक तपासणी सुरू असताना पुष्पेंद्र याला दिलेल्या सोन्यापैकी केवळ ९२.३०० ग्रॅम एवढेच सोने आढळले. उर्वरित १९५.१३० ग्रॅम वजनाचे सोने कमी असल्याने पुष्पेंद्र याने १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोने लंपास केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी शोरुमचे फ्लोअर मॅनेजर गणेश काळे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पुष्पेंद्र बेरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास रवींद्र बोदवडे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.