वाराणसी मतदार संघातून ‘या’ तारखेला पंतप्रधान मोदी भरणार उमेदवारी अर्ज

0

वाराणसी ;- वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, दि. १४ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप शहर अध्यक्ष विद्यासागर राय यांनी रविवारी ही माहिती दिली. राय म्हणाले की, १३ मे रोजी मोदी मतदारसंघात रोड शो करणार असून त्याची तयारी सुरू आहे. रोड शोचा मार्ग निश्चित झाला आहे.

काँग्रेसने वाराणसीतून उत्तर प्रदेश युनिटचे प्रमुख अजय राय यांना उमेदवारी दिली असून बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) अथर जमाल लारी यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.