पाचोरा येथे महायुतीचा निर्धार विजयाचा महामेळावा

0

जळगाव :- जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणून विक्रम प्रस्थापित करू असा निर्धार पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत विश्वगुरू म्हणून जगात आपले स्थान निर्माण करीत आहे. समाजातील शेवटच्या माणसाला स्वभिमानाने जगता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्यामुळेच भारत आर्थिक विकास करू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपाई या पक्षांच्या महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतदान करण्याचा निश्चय करण्यात आला.

मेळाव्याला राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, आ. मंगेशदादा चव्हाण, किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, रावसाहेब पाटील, अनिल वाघ, मधुकर काटे, प्रदीप बापू पाटील, डी. एम. पाटील, पद्मसिंग राजपूत, परेश पाटील, अभिलाशा रोकडे, पवन भिलाभाऊ सोनवणे, सोमनाथ पाटील यांसोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.