कार बसच्या धडकेत ४ जण ठार ; ३ जण गंभीर

0

अहमदनगर ;- धोकादायक वळणावर भरधाव कारची समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक बसून झालेल्या अपघातात श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील चार भाविक ठार झाले आहेत, तर तीन जण गंभीर जखमी झाले . आळंदी येथून दर्शन घेऊन ते कारने गावाकडे येत होते. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास श्रीगोंदे तालुक्यातील श्रीगोंदे-शिरूर रोडवरील ढवळगाव परिसरात घडली.

अपघातात पारगाव सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे (55), पारगाव संचालक हरी तुकाराम लडकत (60), ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके (55), दत्तात्रय बळीराम खेतमाळीस (60, रा. सर्व पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर कार चालक विठ्ठल गणपत ढाले (36, रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा), रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस (70), रोहिदास हरिभाऊ सांगळे (72, रा. पारगाव सुद्रीक) हे तिघे गंभीर जखमी (Injured) झाले आहेत.

ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मडके, दत्तात्रय खेतमाळीस यांचा समावेशआहे. गंभीर जखमी तिघांपैकी चालक विठ्ठल ढोले, रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदे, रंगनाथ खेतमाळीस या दोन जणांना शिरूर येथील वेदांत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, तर रोहिदास सांगळे यांना ढवळगाव येथील आनंदवन येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. जखमी तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.