हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या नव्हे तर पोलिसाच्या गोळीने झाला ; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

0

मुंबई ;- विजय वडेट्टीवार म्हणाले की, आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना कोणत्याही दहशतवाद्याने गोळ्या घातल्या नाहीत तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या. ही गोष्ट लपवून ठेवली होती आणि देशद्रोही उज्ज्वल निकम आहे. गद्दाराला तिकीट दिले तर भाजप हा देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का असा प्रश्न पडतो. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा समोर आला असून, त्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, हे माझे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या आधारे केले होते. त्यामध्ये तसा उल्लेख होता. ती गोष्ट खरी असेल तर हा देशद्रोहाचा प्रकार आहे, असे मी म्हटल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ते रविवारी कोल्हापूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

वास्तविक, यावेळी भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट रद्द करून उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. निकम हे तेच सरकारी वकील आहेत ज्यांनी कसाबला फाशीची शिक्षा दिली. आता काँग्रेस निकम यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहे. निकम यांच्या विरोधात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर गदारोळ झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ते म्हणाले, ‘उज्ज्वल निकमसारख्या देशभक्ताला आम्ही तिकीट दिले, मग हे विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केली, असे सांगतात, आता मुंबईत बॉम्बस्फोट झालेल्या अजमल कसाबची चिंता का? आमची महायुती उज्ज्वल निकम यांच्यासोबत असून त्यांची महाविकास आघाडी अजमल कसाब यांच्यासोबत आहे. कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे?’

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.