महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट : जळगावात उन्हाचा चटका कायम

0

लोकशाही न्युज नेटवर्क –

राज्यात सध्या अवकाळी पावसाचे संकट कायम असून अवकाळीचं संकट नेमकं कधी दूर होणार? याची वाट बळीराजा पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने शनिवार आणि रविवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांत येलो अलर्ट?
सोलापूर, सांगली, जालना, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शनिवार आणि रविवार दोन दिवस तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते. या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

शनिवारी आणि रविवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाडा आणि विदर्भात ताशी ४० ते ५० च्या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काही भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी पिकांची तसेच फळबागांची काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.

जळगावात उन्हाचा चटका कायम
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला असला तर जिल्ह्यात उन्हाचा चटका मात्र कायम आहे. जिल्ह्याचा उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. यामुळे जळगावकर होरपळून निघत आहे. यामुळे आता जळगावकरांना मान्सूनच्या पावसाची उत्सुकता लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.