प्रवाशी महिलांच्या पर्समधून दीड लाखांचे दागिने लांबवीले ; अमळनेर बस स्थानकावरील घटना

0

अमळनेर ;- बसस्थानक आवारात दोन प्रवाशी महिलांच्या पर्समधून सुमारे १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरूवार २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, भारती राजेंद्र धनगर वय ४७ रा. वर्डी ता. चोपडा या महिला कामाच्या निमित्ताने गुरूवार २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानक आवारात आलेल्या होत्या. त्यावेळी बसस्थानकात पुष्पा अरून देसले या महिला देखील होत्या. दोघांच्या पर्समधून एकुण १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार दोन्ही महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बसस्थानक आवारातील संपुर्ण परिसरात माहिती घेतली. परंतू दागिन्यांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अ ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धातक्रार दिल्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत शिरसाठ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.