चार वाहनांची एकमेकांना धडक; अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

0

एरंडोल : येथील म्हसावद रस्त्यावर श्री कृपा जिनिंग जवळ चारचाकी, ट्रक, अॅपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील रा. ठाकरे कॉलनी, पाचोरा (मुळगाव सामनेर) हा युवक जागीच ठार झाला आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

ट्रक क्रमांक आर. जे. १० बी.जी. ८५२८ हा एरंडोलकडून म्हसावदकडे जात असताना या ट्रकला मागून येणारी एम.एच.१९ डी.क्यू ८१७४ क्रमांकाची मोटरसायकल ओव्हरटेक करत होती. याच वेळी म्हसावदकडून एरंडोलकडे जाणारी अॅपे रिक्षा क्रमांक एम.एच. १९ व्ही. १२६७ हिला मागून येणारी चारचाकी (ईरटीका) एम. एच. १८ बी.सी. १४०८ ही ओव्हरटेक करत असल्याने दुचाकी व चारचाकी एकमेकांवर समोरासमोर धडकल्या. या अपघातात ट्रक व अॅपेरिक्षा देखील त्यांच्यावर आदळल्यानेविचित्र अपघात होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण पाटील ह्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

मृत युवक हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. यावेळी गणेश पाटील खेडी, राजू भावसार एरंडोल, विठ्ठल वंजारी एरंडोल व उमरजे येथील काही ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी सदर घटनेची माहिती मिळताच तत्परतेने अपघात स्थळी दाखल झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.