Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
    गुन्हे वार्ता

    एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 18, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील एमआयडीसीतील रेमंड चौक येथील माहेर असलेल्या रूपाली प्रसन्नकुमार गव्हाळे यांचा विवाह पुण्यातील सुयोग कॉलनी येथील प्रसन्नकुमार पंढरीनाथ गव्हाळे यांच्याशी झाला आहे. आजारपणासाठी विवाहितेला माहेराहून १ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहिते माहेराहून पैसे आणले नाही. या रागातून पती प्रसन्न कुमार याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली तर सासू, सासरे, दिर आणि दिराणी यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला.

    हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती प्रसन्नकुमार पंढरीनाथ गव्हाळे, सासू कलावती पंढरीनाथ गव्हाळे, सासरे पंढरीनाथ गव्हाळे, दीर सुशांत पंढरीनाथ गव्हाळे, दिराणी सपना सुशांत गव्हाळे, नणंद प्रज्ञा दिनेश वानखेडे सर्व रा. पुणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.

     

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif