मंत्री महाजन सरकार दरबारी झोपा काढतात का?

0

उन्मेष पाटील यांचा हल्लाबोल : दूध संघात भ्रष्टाचाराची ‘गंगा’

जळगाव ;– जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक विविध समस्यांनी भरडला जात असतांनाही त्यावर ‘ब्र’ शब्दही न काढणारे मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात कमी पडले असून सरकार दरबारी ते झोपा काढतात का? असा सवाल करुन खासदार उन्मेष पाटील यांनी पुन्हा श्री. महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जिल्हा दूध संघात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढत असून दूधगंगा ऐवजी दूध संघ भ्रष्टाचाराची गंगा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. खा. पाटील पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तायडे, गजानन मालपूरे, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील उपस्थित होते.

खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, दूध संघाचे चेअरमन स्वत:ला मिरवण्यात मग्न झालेले आहे. दूध संघ ही त्यांची खाजगी प्रॉपर्टी नसून शेतकऱ्यांची संस्था आहे. दूध दरवाढ अनुदान उत्पादकांना मिळाले नाही. सरकार दरबारी अनुदानासंदर्भातील प्रस्ताव पाठविला गेला नसल्याने शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले नाही. दूधावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बंद करण्यात आले असून हे चहा पावडत तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दूध उत्पादकांना पूर्वी कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात होते. हे प्रशिक्षण केंद्र धुळखात पडले असून चेअरमन मंगेश चव्हाण हे तेथील रेस्ट हाऊस तयार करण्यात मग्न आहे. दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघात गेले असून तेथे झोपा काढण्यासाठी नाही असा हल्लाही त्यांनी चव्हाण यांच्यावर केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असून त्या सोडविणे गरजेचे झाले असतांनाही चेअरमन त्याकडे लक्ष देत नाहीत. जिल्हा दूध संघ ‘अ’ वर्गात होता तो यांच्या काळात ‘ब’ वर्गात आला असून हेच त्यांचे कार्य असल्याचा टोला हाणला.

फडणवीसांच्या मागेपुढे करण्यात मग्न
दूध संघाचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण हे चमकोगिरी करण्यात पुढे असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागेपुढे करण्यात चे मग्न असून समस्या सोडविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. दूध उत्पादकांच्या समस्या त्वरीत सोडविल्या नाही तर आगामी काळात आंदोलन उभारले जार्इल असा इशाराही खा. पाटील यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.