ग्रामस्थांना दारू पाजून भाजपच्या एलईडी व्हॅनला केला विरोध !(व्हिडिओ)

चाळीसगावात उबाठाचे गलिच्छ राजकारण : करण पवारांना झटका बसण्याची शक्यता

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली असून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने ही बाब शिवसेना उबाठा गटाच्या जिव्हारी लागली असून ते खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. तालुक्यातील गोरखपूर येथे प्रचारासाठी गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एलईडी व्हॅनला एका ग्रामस्थाने विरोध केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात सदर ग्रामस्थ हा दारूच्या नशेत संबंधित एलईडी व्हॅन चालकाला आमच्या गावात फिरू नका असे सांगत असल्याचे दिसत होता व एक व्यक्ती सदर घटना आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करत असल्याचे दिसत होते. शिवसेना उबाठा गटाच्या या गलीच्छ राजकारणामुळे उमेदवार करण पवार यांना झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यातील गोरखपूर येथील घटना अगदी ठरवून कट रचून केली असल्याचे दिसून येत आहे. ज्या व्यक्तीचा हा व्हिडीओ बनवला आहे तो पूर्णत: कट रचून केल्याचे दिसते, याबाबत सकाळी सदर व्यक्ती प्रेमसिंग जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्याने रात्री काय झाले हे माझ्या लक्षात नसून गावातील उद्धव ठाकरे (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्याने आम्हाला दारू पाजून विरोध करायला लावला असल्याचे सांगितले. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून झालेल्या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली.यामुळे उबाठा गटाचा गलिच्छ चेहरा उघड झाला असून बनावट कट कारस्थानाच्या माध्यमातून विरोधी पक्षाची बदनामी करण्याचे काम जनतेसमोर आले आहे.

पराभवाच्या भीतीने पायाखालची वाळू सरकलेला उबाठा सेनेने मतदारसंघात असे गलिच्छ राजकारण सुरु केले असून काही दिवसांपूर्वी पोहोरे येथील असाच एकच बनावट व्हिडीओ व्हायरल केला होता. मात्र जनता अश्या भूलथापांना व फेक व्हिडीओना बळी पडणार नाही. एकीकडे बंजारा समाजात अनेक साधू संत हे व्यसनमुक्तीसाठी काम करत असून त्यांच्या जनजागृतीमुळे मोठ्या प्रमाणात अनेक व्यक्तींनी व्यसनाचा त्याग केला आहे मात्र दुसरीकडे आपल्या राजकारणासाठी दारू पाजून ग्रामस्थांचा वापर करणाऱ्या उबाठा सेनेच्या या कृत्यामुळे मतदारसंघात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

उबाठा गटाबद्दल संताप
तालुक्यात असे प्रकार शिवसेना उबाठा गटाकडून होत असून नागरिकांना दारुचे व्यसन लावण्यात येत आहे. आपल्या हितासाठी असे प्रकार ग्रामस्थ खपवून घेणार नाहीत असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे उबाठा गटाबद्दल तालुक्यात संतापीची लाट उसळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.