१० वी च्या निकालाची तारीख जाहीर; या तारखेला लागेल निकाल…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आज महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के इतका लागला. यावेळीही निकालात मुलींनी आपले वर्चस्व कायम राखत बाजी मारली आहे. यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, असेही सांगितले. दरम्यान त्यांना यावेळी दहावी निकालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. दहावीचा निकाल कधी? या प्रश्नावर बोलताना दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in  , www.mahresult.nic.in, www.msbshse.co.in वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या मदतीनेदेखील तुम्ही निकाल पाहू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.