Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त, आपण दणदणाट निधी आणतो – आमदार मंगेश चव्हाणांचे विधान
    उत्तर महाराष्ट्र

    मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त, आपण दणदणाट निधी आणतो – आमदार मंगेश चव्हाणांचे विधान

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त आहे, त्यामुळे आपण दणदणाट निधी आणतो आणि पैसे वाटतो असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

    त्यांच्या प्रचाराची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सद्या ते मतदारा संघात विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. विशेषत: चाळीसगाव मतदार संघात ते मतदारांशी प्रत्येक गावात जावून संपर्क साधत आहेत. काही ठिकाणी कॉर्नर सभाही घेत आहेत.अशीच चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घेतलेल्या त्यांच्या सभेची एक क्लीप व्हायरल झाली आहे.

    मंगेश चव्हाण सध्या जनतेला आपण आमदार म्हणून विकास निधीच्या माध्यमातून केलेल्या कामांची आणि आणलेल्या निधीची साक्ष पटवून देत आहेत. त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी वेळोवेळी निधी आणलेला असल्याचे सांगितले, यावेळी ते म्हणाले, ‘आपण जे बोलतो ते करतो याचा कोणताही गाजावाजा करीत नाही, तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही झाले, झाले ना! तुम्हाला मिळायला पाहिजे हेच आपले ध्येय असते, कसे बसवायचे ती माझी कला आहे, मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त आहे, त्यांच्या माध्यमातून आपण दणदणाट निधी आणतो तो वाटतो.’ तसेच, ‘मंत्रालयात ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या असतील ते आपले दोस्त आहेत. यात देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस), गिरीशभाऊ (गिरीश महाजन) असतील किंवा मंत्रिमंडळातील सहकारी असतील. त्यांच्याकडे तिजोरीच्या चाब्या असतात ते आपले दोस्त असल्यामुळे जेंव्हा लागेल तेंव्हा आपण तिजोरी खोलतो आणि निधी वाटतो. एखाद्या गावातील जनतेने कामासाठी जर निधी मागितला तर त्यासाठी आपण नाही म्हणायचे का? आपण काम करतोच! नाही म्हणायचे आपले काम नाही.’ असे मंगेश चव्हाण म्हणाले.

    चव्हाण- पाटलांचे आव्हान
    भारतीय जनता पक्षातून शिवसेना ठाकरे गटात गेलेले खासदार उन्मेश पाटील व आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव येथीलच आहेत. एकेकाळी दोघेही जीवलग मित्र होते परंतु त्यांचे अंतर्गंत वाद झाल्याने दोघे एकमेकांचे राजकीय शत्रू झाले आहेत. तर मंगेश चव्हाण यांच्या विरोधामुळेच आपली भाजपची उमेदवारी गेल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ते आता शिवसेना ठाकरे गटातून चाळीसगाव विधानसभा निवडणूकीत मंगेश चव्हाण यांना आव्हाण देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #chalisgaon mangesh chvhan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif