विवरे येथील ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

0

भुसावळ : पाच हजारांची लाच मागणी करणार्‍या रावेर तालुक्यातील विवरा ग्रामविकास अधिकार्‍याविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिगंबर जावळे असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामविकास अधिकार्‍याचे नाव असून संशयीत मात्र पसार झाला असून याचा शोध सुरु आहे.

विवरे बु.॥, ता.रावेर गावातील तक्रारदार यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी कागदपत्रे हवे होते. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून नमुना नंबर 8, फेरफार दाखला, चर्तुसीमा व ना हरकतीचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी दहा हजार रुपये लाच मागितली होती , त्याचदिवशी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीत आरोपीने पाच हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले मात्र आरोपीला सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर आरोपीविरोधात मंगळवारी निंभोरा, ता.रावेर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपीला पथकाची कुणकुण लागताच संशयीत पसार झाला.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, चालक एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा गुन्हा दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.