पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणास मारहाण

0

यावल : सातपुड्यातील लंगडा आंबा येथे  पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना घडली. तसेच तरुणाच्या घरावर दगडफेक करुन नुकसान केले. याप्रकरणी यावल पोलिसात दोन जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपुड्याच्या डोंगरातील लंगडा आंबा गावात आमाशा गिला बारेला (वय २३) याच्या घरी मयूर रातु बारेला आणि संगीता रातु बारेला हे दोघे आले. दारूच्या नशेत असलेल्या मयुर बारेला याने तरूणावर पोलिसांचा खबरी आहे. तुझ्या मुळे माझ्या वडीलांना पोलिसांनी पकडले असे सांगत शिवीगाळ करत, ठार मारण्याची धमकी दिली. व घराच्या दिशेने दगडफेक करून त्यांच्या घराचे नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या दिशेने वीट मारून फेकल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.  यावल पोलीस ठाण्यात आमाशा बारेला यांच्या फिर्यादीवरून मयूर बारेला व संगीता बारेला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.