रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी पहिला उमेदवारी अर्ज केला दाखल

0

जळगाव ;- रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांनी आपले पहिले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत.

आज माहायुतीकडून जळगावात रॅली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काढण्यात येऊन महायुतीचे दोन्ही उमेदवार आपला अर्ज दाखल करणार होते . मात्र आज अखेरचा दिवस उमेदवारी अर्ज सादर करण्याचा असल्याने दोन्हीही उमेदवारांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यायला उशीर होत असल्याने दोन्ही उमेदवारांनी आपापले पहिले उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यामंत्र्याचें आगमन होऊन महायुतीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.