राज्यात दुसऱ्या टप्प्यात प्रचार तोफा थंडावल्या ; उद्या मतदान

0

नवी दिल्ली;– दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला असून या प्रचारात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी इंडिया गटातील प्रमुख नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. येत्या26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 88 मतदारसंघात, तसेच मणिपूर लोकसभा मतदारसंघातील उर्वरित भागांमध्ये मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1206 उमेदवार आणि बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातून 4 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.भारतीय निवडणूक आयोगानुसार 2633 उमेदवारी अर्ज दाखल, तर 1428 वैध आढळले. सर्व 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 2633 नामांकन दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी केल्यानंतर 1428 अर्ज वैध आढळले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात केरळमधील 20 लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त 500 उमेदवारी अर्ज आहेत. यानंतर कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघातून 491 उमेदवारी अर्ज आले आहेत. त्रिपुरातील लोकसभा मतदारसंघातून किमान 14 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.