धुळे मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांना धक्का; वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद…

0

 

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

लोकसभेच्या निवडणुका आता वाढत्या तपमानाप्रमाणे अधिकच तापू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकास्त्रांचे युद्ध सर्वत्र बघायला मिळत आहे. मात्र अश्यात धुळे येथून वंचित बहुजन आघाडी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीचे या मतदारसंघातील उमेदवार माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननीअंती बाद झाला आहे. धुळे मतदारसंघात महायूतीकडून भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अर्ज बाद झाल्यामुळे वंचितला मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक जिल्हयातील मालेगाव हे शहर मुस्लीम बहूल असून धुळे मतदारसंघात त्यामुळे वंचित बहूजन आघाडीचे अब्दूल रहमान यांच्या मतांचे विभाजन होऊन महाविकास आघाडीला नुकसान होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतू अब्दूल रहमान यांचा अर्ज बाद झाल्याने धुळयाची निवडणूक आता कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात होणार आहे हे स्पष्ट झाले आहे. परंतू निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाविरोधात अब्दूल रहमान हायकोर्टात जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.