जैसलमेरमध्ये हवाई दलाचे टोही विमान कोसळले

0

जैसलमेर;- जैसलमेरच्या पिथाला-जझिया गावात गुरुवारी सकाळी एक मानवरहित टोही विमान कोसळले. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. गावकऱ्यांच्या माहितीवरून हवाई दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. या विमानाचा वापर आकाशातील हेरगिरीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.आगीत टोही विमान पूर्णपणे नष्ट झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हवाई दलाच्या अधिकाऱ्यासह स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्तजागा सील करण्यात आली आहे. अपघाताचा तपास करण्यात येत आहे.

ही घटना आज सकाळी घडली. एका स्थानिक गावकऱ्याने सांगितले की, विमान आकाशातून प्रचंड वेगाने जमिनीवर पडले. विमान पडताच मोठा स्फोट झाला. पहाटे झालेल्या स्फोटामुळे लोक घाबरले. ज्या ठिकाणी विमान पडले त्या ठिकाणी ज्वाळा निघत होत्या. भीतीमुळे घटनास्थळाजवळ कोणीही जात नव्हते. या घटनेची माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना समजली.

Leave A Reply

Your email address will not be published.