चाळीसगावात तरुणीची दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

0

 

चाळीसगाव ;- घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी लांबविल्याची घटना १७ एप्रिल रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी दुचाकी चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून कोमलसिंग विजयसिंग राजपूत वय २५ रा. चाळीसगाव असे जेरबंद केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, करिश्मा दिनेश छोरीया वय ३२ रा. दत्तवाडी चाळीसगाव यांनी १३ एप्रिल रोजी रात्री ८ ते १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय २७७१) ही घरासमोर पार्कींगला लावलेली होती. त्यावेळी मध्यरात्री संशयित आरोपी कोमलसिंग राजपूत याने ही दुचाकी चोरून नेली. अखेर शुक्रवारी ३ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी कोमलसिंग विजयसिंग राजपूत वय २५ रा. चाळीसगाव याने दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला पोलीसांनी अटक केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.