जामनेरात भिषण आगीमुळे तीन दुकानं जळुन खाक…

0

 

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शहरातील पाचोरा रोडवरील भारत पेट्रोलियम पंपासमोर सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकानं संपूर्ण खाक झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की दिनांक २२ रोजी सकाळी ६ वाजता अचानक मोरया अर्थ मुव्हर्स या दुकानाला आग लागली. विविध कंपन्यांच्या ऑईलचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले त्यामुळे दुकानातील इतर सामानही पुर्णपणे जळुन खाक झाला आहे. तसेच यात रीपेअरींगसाठी लावलेले वाहन देखील जळुन खाक झाले आहे. तर बाजुलाच असलेले गॅरेज देखील आगीत सापडले. सोबतच लागुनच असलेल्या जेवणावळीचा ढाबा व ढाब्यातील सामान व फर्निचरही जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेची माहिती मिळताच जामनेर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. आणि वेळेत आग विझवल्याने बाजुला असणारे दुकानं या आगीत येण्यापासून वाचली आहेत. हि आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. रीतसर पंचनामा करण्यात यावा अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.