उन्हाची तीव्रता इतकी कि, सैन्य दलाच्या जवानाने पापड भाजून दाखवला…(व्हिडीओ)

0

 

बिकानेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सध्या देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेली लाट, भीषण गर्मी आणि उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही जन थंड हवेच्या ठिकाणी परिवारासह सहलीला तर काही जण घरीच AC किवा कुलर मध्ये राहून उकाड्याला घालवत आहेत. दरम्यान याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाचा राजस्थानमधील बिकानेरमध्ये असलेल्या उन्हाची तीव्रता दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे, चक्क या जवानाने तप्त रेतीत पापड ठेवून भाजून हि दाखवला आहे. यामुळे तेथील परिस्थितीचा अंदाज आपल्याला लावता येईल.

 

पण, एवढ्या कडक उन्हात देखील आपल्या रक्षणासाठी भारतीय जवान तैनात असल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्या देशसेवेला दाद दिली. यावेळी कमेंटच्या माध्यमातून लोकांनी जवानांच्या कार्याला सलाम ठोकत आहेत. राजस्थानमधील बिकानेर येथे तब्बल ४७ सेल्सिअस इतके तापमान आहे.
भारतीय जवानाच्या कार्याला सलाम करताना एकाने म्हटले की, भारतीय जवानांचे कौतुक करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील. तर, जवानांचे जीवन खूप कठीण आणि संघर्षमय असते. त्यांच्या या देशसेवेसाठी कडक सॅल्युट, असे एका युजरने कमेंटच्या माध्यमातून म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.