ऑनलाइन जुगार, सट्टयांच्या पेढीवर पोलिसांच्या धाडी; चौघांवर गुन्हा दाखल…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथे ऑनलाइन जुगार अड्ड्यासह सट्टयांच्या पेढीवर पोलिसांनी धाडी टाकत त्याठिकाणाहुन ३१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत चार जणांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरातील खडकदेवळा रोडवरील जारगाव चौफुली येथे अवैधरित्या ऑनलाइन जुगार व सट्टा मटका खेळला जात असल्याची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी व पो.कॉ. योगेश पाटील हे घटनास्थळी रवाना झाले. यावेळी पथकाने घटनास्थळावरून दोन ऑनलाइन जुगार अड्ड्यांवरुन ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल व दोन सट्टा मटका घेणाऱ्या पेढीवरुन ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आणि सोबतच ऑनलाइन जुगार अड्ड्यांवरील प्रदिप पाटील रा. जारगाव ता. पाचोरा, संदिप सुर्यवंशी रा. मिलिंद नगर, पाचोरा तसेच सट्टा मटका पेढीवरील मोतीलाल पुसरणानी रा. सिंधी कॉलनी, पाचोरा व संजय चव्हाण रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा यांचे विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राहुल शिंपी व पो.ना राहुल बेहरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.