बापरे.. अमिबाने मेंदू खाल्ल्याने मुलीचा मृत्यू

स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताय..

0

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्विमिंग पूलमध्ये जर आंघोळ करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. कारण यामुळे एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतांना अमिबाने मेंदू खाल्ल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. हे ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल.

अमिबा अमर आहे 

अमिबा हा जगातील छोटासा जीव असला तरी खूप धोकादायक आहे. त्यावर वैद्यकीय जगतालाही मात करता आलेली नाही. अमिबा हा अमर मानला जातो. म्हणजे मारूनही तो मरत नाही. अमिबा हा अत्यंत उष्ण वातावरणात पाण्यामध्ये वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात गलिच्छ तलाव किंवा वॉटर पार्कमध्ये आंघोळ करणे  महागात देखील पडू शकते.  केरळमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. या मुलीला ‘नेग्लेरिया फॉलेरी’ हा दुर्मिळ संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा संसर्ग अमिबाने मेंदू खाल्ल्याने होतो. एका तलावात अंघोळ केल्याने तिला हा आजार झाला.

.. कुटुंब वाढवतो

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नेग्लेरिया फॉलेरी संसर्गाला प्राइमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (पीएएम) म्हणतात. हा संसर्ग Naegleria fowleri नावाच्या अमिबामुळे होतो. अमीबामध्ये एकच पेशी असल्याने तो त्याचा आकार सतत बदलत असतो. महत्त्वाचे म्हणजे तो कधीही मरत नाही. 1960 च्या दशकात ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा याचा शोध लागला होता.  हा प्राणघातक अमिबा जगभरात आढळतो. जो उबदार गोड्या पाण्यात राहतो. हा अमिबा पोहताना किंवा आंघोळ करताना नाकातून शरीरात प्रवेश करतो. महत्त्वाचे म्हणजे हा अमिबा उच्च तापमानात म्हणजे 46 अंश सेंटीग्रेडमध्ये आणखी वेगाने वाढतो आणि त्याचे कुटुंब वाढवतो.

याठिकाणी अमिबा आढळतो 

हा अमिबा स्विमिंग पूल, वॉटर पार्कमध्ये वाढतो. तलाव, नद्या, जलतरण तलाव, स्प्लॅश पॅड, सर्फ पार्क, वॉटर पार्क यांसारख्या उबदार गोड्या पाण्याच्या ठिकाणी हा धोकादायक अमीबा अधिक वेगाने वाढतो. विशेषत: ज्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही किंवा क्लोरीन किंवा ब्लीचिंग पावडरने पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही अशा ठिकाणी तो वाढतो. सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करताना किंवा पोहताना Naegleria fowleri amoeba नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि तेथून तो मेंदूमध्ये जातो. हा अमिबा मेंदूमध्ये प्रवेश करताच, तो मेंदूच्या पेशी आणि ऊतींचा नाश करू लागतो. त्यामुळे मेंदूला सूज येते.

लक्षणे

डोकेदुखी, ताप, सर्दी, उलट्या यासारख्या समस्यांचा समावेश होतो. रुग्णाच्या मानेमध्ये कडकपणा येतो. नंतर तो कोमात जातो. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अभ्यासानुसार, या संसर्गाने पीडित रुग्णाचा 1 ते 18 दिवसांत मृत्यू होतो. कोमात गेल्यावर रुग्ण जास्तीत जास्त ५ दिवस जिवंत राहू शकतो. या जीवघेण्या आजारावर अद्याप कोणताही इलाज सापडलेला नाही. यावर डॉक्टर अनेक प्रकारची औषधे देतात, पण त्याचा रुग्णावर काही परिणाम होतोच असे नाही. भारतात आतापर्यंत अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसची २० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 2016 मध्ये केरळमध्ये या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

काय काळजी घ्यावी 

नाकाची क्लिप घातल्याने दूषित पाणी नाकात जाण्यापासून रोखू शकता. गरम हवामानात तलाव किंवा वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूलमध्ये पोहताना याची काळजी घेतली पाहिजे. डोके पाण्याच्या वर ठेवल्यास दूषित पाणी नाकात जाण्यापासून रोखता येते. तलाव आणि नद्यांच्या तळाशी गाळ खोदणे किंवा ढवळणे देखील टाळले पाहिजे, कारण येथेच अमीबा राहण्याची शक्यता असते. सायनसमध्ये पाणी टाकताना किंवा नाक साफ करताना उकळलेले आणि थंड केलेले पाणी किंवा डिस्टिल्ड वॉटर वापरावे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.