जामनेरात दुचाकी घसरून पडलेल्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटना वाढल्याचे चित्र आहे. दररोज कुठेतरी अपघात होत आहेत. अश्यातच जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये ३५ वर्षीय व्यक्तीचा दुचाकीवरून घसरून पडल्याने डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीत उपचारादरम्यान गुरूवार २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. मुकेश रमेश पाटील (३५) रा. जामनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मुकेश पाटील हा तरूण आपल्या परिवारासह जामनेर शहरात वास्तव्याला होता. १९ एप्रिल रोजी मुकेश पाटील हा कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाला होता. त्यावेळी जामनेर शहरातील अथर्व हॉस्पिटलजवळ त्याची दुचाकी घसरून त्याचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला जामनेर येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता त्याची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ राजेश परमार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.