“खंडेराव महाराज की जय” उद्घोषाने दणाणला जुने जळगाव परिसर…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जळगाव शहर हे अनेक परंपरा जोपासत आलेले शहर आहे. येथील श्रीराम रथोत्सव असो, कि त्यावेळी भवानी मातेचे सोंग असो, त्याच पद्धतीने जुने जळगावात तब्बल दीडशे वर्षांची परंपरा श्री खंडेराव महाराज यांच्या बारागाड्या ओढण्याच्या उत्सवाला आहे. शनिवारी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्री खंडेराव महाराज यांच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री खंडेराव महाराज की जयच्या जयघोषाने बारागाड्यांना सुरूवात करण्यात आली. यावेळी हळदीच्या भंडाऱ्याने सुवर्णनगरीला सोन्याहून पिवळेपण आल्याचे विहंगम दृश्य होते.

जळगाव शहरातील जुने जळगावात सुमारे १५० वर्षांपासूनची परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या उत्सवाच्या निमित्ताने आज बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भगत रमेश नारायण धनगर यांना बारागाड्या ओढण्याचा मान मिळाला. जुने जळगावाचे पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी विधीवत पुजा केली. त्यानंतर बारागाड्यांना ओढण्याची सुरूवात झाली. या बारागाड्या तरूण कुढापा मित्र मंडळ चौक ते जुने जळगाव बहुउद्देशीय मित्र मंडळ चौकपर्यंत ओढण्यात आल्या. या उत्सवाला शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. यावेळी खंडेराव महाराज की जयच्या जयघोषाने बारागाड्या उत्साहात काढण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.