पारोळ्यात ५४ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पारोळा येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रवींद्र दगडू पाटील असे मयत व्यक्तीचे नाव असून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहरातील पाठक गल्लीतील रहिवासी रविंद्र दगडु पाटील (५४) हे रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवणानंतर “गावातुन फिरुन येतो” असे सांगुन बाहेर पडले, बराच वेळ परत न आल्याने त्यांच्या मुलाने शोधाशोध केली यादरम्यान त्यांना एका मित्राने फोन करुन कळविले की, बहादरपुर रोडवरील गोविंद शिरोळे यांच्या शेतात निंबाच्या झाड्याला तुझ्या वडिलांनी गळफास घेतला आहे. यावेळी त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पारोळा पोलिसात यशवंत रविंद्र पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.